Dharwad

‘चिगरी’ बीआरटीएस बसची ‘ब्रेकडाऊन’मुळे प्रवाशांना डोकेदुखी

Share

हुबळी आणि धारवाड या जुळ्या शहरांमध्ये प्रवाशांना जलद वाहतूक सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एचडी बीआरटीएस’च्या ‘चिगरी’ बसेस वारंवार मध्येच रस्त्यावर बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

हुबळी-धारवाड जुळ्या शहरांतील मुख्य रस्त्यांवर धावणाऱ्या ‘चिगरी’ बसेसमध्ये यापूर्वीही अनेक वेळा तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. बस रस्त्यात बंद पडल्यास प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये हलवून तात्पुरती समस्या सोडवली जाते. मात्र, बीआरटीएस बसेसना हा तांत्रिक दोष सातत्याने सतावत आहे. अशीच एक घटना नुकतीच धारवाडच्या टोलनाक्याजवळ घडली, जिथे एक्सेल तुटल्यामुळे ‘चिगरी’ बस पावसात रस्त्यात बंद पडली. बीआरटीएस बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये स्थलांतरित करावे लागल्याचे चित्र दिसून आले.

हायटेक सुविधा असलेली ‘चिगरी’ बस वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांना दररोज या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बीआरटीएस बसेसमधील तांत्रिक दोष कधी दूर होणार, असा प्रश्न आता ‘चिगरी’ बसने प्रवास करणारे प्रवासी विचारत आहेत.

Tags: