“जर खोटं बोलण्यासाठी ऑस्कर पुरस्कार द्यायचा झाल्यास, तो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला पाहिजे,” असे विधान कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आणि मुख्य सचेतक सलीम अहमद यांनी केले.

आज हुक्केरी शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. सत्तेत येऊन ११ वर्षे उलटली, तरी त्यांचे कोणतेही आश्वासन पूर्ण झाले नाही. बेरोजगारांना रोजगार, परदेशातून काळा पैसा परत आणणे, शेतकऱ्यांसाठी मदतनिधी यासह अनेक खोटी आश्वासने देऊन त्यांनी देशातील जनतेची फसवणूक केली आहे.”
यामुळे आगामी काळात केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार हे निश्चित आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकातही आमच्या काँग्रेस सरकारने ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली असून, जनतेचे आवडते सरकार म्हणून काम केले आहे. त्यामुळे २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार, हे निश्चित आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी नगरपालिकेचे अध्यक्ष इम्रान मोमीन आणि गॅरंटी अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष शानूल तहसीलदार यांनी सलीम अहमद यांचे स्वागत आणि सत्कार केला.
यावेळी रवी कराळे, सलीम कळवंत, कबीर मल्लिक, इम्रान मोमीन, बसू कोळी, सादिक मकानदार, दस्तगीर काझी, अल्ताफ बेपारी, सोयब मुजावर, इम्रान मांजरी, इरफान कळवंत, जीनगौडा इमगौडनवर, चंदू गंगण्णवर, जयगौडा पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments