Savadatti

महिला विकास निगमच्या अध्यक्षा पद्मावतींकडून सौंदत्तीत वाणिज्य संकुलाची पाहणी

Share

महिला विकास निगमच्या अध्यक्षा पद्मावती यांनी शुक्रवारी सौंदत्ती येथील यल्लम्मा टेकडीला भेट देऊन, निगमच्या वतीने बांधण्यात आलेल्या वाणिज्य संकुलातील गाळ्यांची पाहणी केली.

गाळ्यांच्या वाटपाबद्दल त्यांनी देवस्थान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याच वेळी त्यांनी उद्योजिनी योजनेच्या लाभार्थ्यांच्या युनिट्सला भेट देऊन डी.आर.पी. सर्वेक्षणाची पाहणी केली. त्यानंतर, त्यांनी माजी देवदासी महिलांशी संवाद साधला आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी उपयुक्त अशा सूचना दिल्या.

यावेळी महिला विकास निगमच्या प्रधान व्यवस्थापक अक्कमहादेवी, सौंदत्तीच्या एकात्मिक बाल विकास योजना अधिकारी अमृत साणिकोप्प, सहायक बाल विकास योजना अधिकारी हिरेमठ, यल्लम्मा टेकडी प्राधिकरणाचे अभियंता चौहान, विकास निरीक्षक रूपा पवार, देवदासी पुनर्वसन योजना अधिकारी पुष्पा शहामाने, टी. जी. कम्युनिटी टी. एच. ओ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Tags: