
बेळगाव येथील कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमधील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात नूतन ‘मटेरियल टेस्टिंग प्रयोगशाळे’चे उद्घाटन करण्यात आले.

बेळगावच्या केएलएस जीआयटी कॉलेजमधील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात आज फास्रॉक केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या मदतीने उभारण्यात आलेल्या मटेरियल टेस्टिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले.
कॉलेजच्या स्ट्रक्ಚरल इंजिनीअरिंग प्रयोगशाळेत हा महत्त्वाचा समारंभ पार पडला. बेंगळुरू येथील फास्रॉक कंपनीचे जनरल मॅनेजर शंकर कोत्तूर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून नूतन प्रयोगशाळेला कार्यान्वित केले.
केएलएस जीआयटी कॉलेजच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र बेळगावकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. “या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाचे विद्यार्थी आणि संशोधकांना उत्कृष्ट दर्जाच्या सामग्री परीक्षण आणि संशोधन कार्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. वैभव आर. चाटे आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम.एस. पाटील उपस्थित होते.


Recent Comments