Athani

अथणीत विहिरीत पडून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

Share

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात असलेल्या कोहळी गावात पाय घसरून विहिरीत पडून एका ९ वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

प्रवीण संतोष मंटूर (वय ९) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी सलग ६ तास बचावकार्य चालवले. अथक प्रयत्नांनंतर, विहिरीतून बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच ऐगळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. या दुःखद घटनेमुळे मंटूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबीयांचा आक्रोश गगनाला भिडला आहे.

Tags: