मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनाचे यशस्वी फलित म्हणून, आदिवासी हक्कीपिक्की समाजाला सर्वेक्षणाअंतर्गत आणणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती (समन्वयक संघटना) आणि आदिवासी हक्कीपिक्की समाजाच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बेळगाव जिल्हा प्रधान सचिव राजशेखर हिंडलगी, खानापूर तालुका अध्यक्ष राघवेंद्र चलवादी, मुडेवाडी ग्रामपंचायत सदस्य रवी मादार, वाल्मिकी समाजाचे ज्येष्ठ नेते शशीधर नायक, हक्कीपिक्की समाजाचे नेते दयानंद हक्कीपिक्की यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments