Savadatti

सौंदत्ती येथील ‘हर्षा शुगर्स’ मध्ये ऊस गाळप हंगाम सुरू

Share

सौंदत्ती येथील हर्षा साखर कारखान्यात ऊस गाळप हंगामाचा शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला.

हूळी संभाय्यानावर मठाचे श्री उमेश्‍वर शिवाचार्य यांच्या हस्ते २०२५-२०२६ सालासाठी ऊस गाळप हंगामाला सुरुवात करण्यात आली.

हर्ष साखर कारखान्याच्या अध्यक्षा आणि महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, २०२४-२०२५ या मागील हंगामात कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या २१ प्रगतिशील शेतकऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चन्नराज हट्टीहोळी, गिरिजाताई हट्टीहोळी, कारखान्याचे प्रधान व्यवस्थापक सदाशिव तोराथ, ऊस विभागाचे प्रधान व्यवस्थापक एन. एम. पाटील, इथेनॉल युनिटचे व्यवस्थापक सांब्रेकर, कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी चौकीमठ, कारखान्यातील सर्व विभागाचे कर्मचारी तसेच बैलहोंगल, सौंदत्ती, कित्तूर आणि धारवाड भागातील प्रमुख शेतकरी नेते उपस्थित होते.

Tags: