बीडीसीसी बँक निवडणुकीसंदर्भातील घडामोडींवरून आमदार लक्ष्मण सवदी यांचे समर्थक मल्लिकजान नदाफ यांनी आमदार राजू कागे यांना फैलावर घेतले होते. या प्रकारानंतर नदाफ यांनी आता व्हिडिओ जारी करून आमदार राजू कागे यांची जाहीर माफी मागितली आहे.

बीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण सवदी आणि राजू कागे यांनी एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, राजू कागे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी लक्ष्मण सवदींपासून अंतर ठेवले. या भूमिकेमुळे संतप्त झालेले सवदींचे समर्थक मल्लिकजान नदाफ यांनी आमदार राजू कागे यांना दूरध्वनी करून झापले होते. यावर नदाफ यांनी शुक्रवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. “आमदार लक्ष्मण सवदी यांच्यावरील प्रेमापोटी मी आमदार राजू कागे यांना फोन केला होता. माझ्याकडून चूक झाली असल्यास मी क्षमा मागतो,” अशा शब्दांत त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल क्षमायाचना केली आहे.


Recent Comments