लक्ष्मीबाई जयवंत कोंडूसकर प्रतिष्ठानच्या वतीने वैकुंठधाम रथ सेवेचा आरंभ करण्यात आला असून, आज या सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला.

बेळगाव येथील लक्ष्मीबाई जयवंत कोंडूसकर प्रतिष्ठानच्या वतीने रमाकांत कोंडूसकर यांच्या नेतृत्वाखाली वैकुंठधाम रथ सेवेचा आरंभ झाला आहे. आज बेळगावच्या दक्षिणकाशी श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे विशेष पूजा केल्यानंतर मराठा समाजाचे श्री हरिगुरु महाराज यांच्या हस्ते या सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना श्री हरिगुरु महाराजांनी कोंडूसकर प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. वैकुंठधाम रथ हे, नश्वर शरीर भैरुबाच्या स्मशानापर्यंत पोहोचवणारे नंदीसारखे कार्य करेल, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
याशिवाय, कपिलेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने रमाकांत कोंडूसकर आणि चंद्रकांत कोंडूसकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत चव्हाण यांनी कोंडूसकर प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा केली.
Recent Comments