

ब्रिटिशांविरुद्ध सर्वप्रथम बंडाचे रणशिंग फुंकणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील कित्तूरच्या राणी चन्नम्मा यांच्या विजयोत्सवाला आज औपचारिक सुरुवात झाली.

बेळगाव तालुक्यातील कित्तूर येथे आयोजित २०१ व्या कित्तूर उत्सवाला जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, सवदत्तीचे आमदार विश्वास वैद्य आणि इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. मान्यवरांनी अश्वारूढ राणी चन्नम्मा आणि क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून २०१ व्या कित्तूर उत्सवाच्या मिरवणुकीचा औपचारिक प्रारंभ केला. यानंतर मान्यवरांनी कित्तूर राणी चन्नम्मा सभागृहाच्या इमारतीचे लोकार्पणही केले.
या उत्सवाविषयी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली. यावेळी विविध मान्यवरांनी सहभाग घेतला होता. विविध लोककला पथकांनी सहभाग घेतलेली मिरवणूक सर्वांसाठी आकर्षण ठरली.


Recent Comments