Kagawad

अथणीतील कार्यकर्त्याला चिदानंद सवदींनीच प्रवृत्त केले : सत्यप्पा बागेन्नावर

Share

अथणीतील भाजप पक्षाचे नेते सत्यप्पा बागेन्नावर यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला आहे की, बेळगाव बी.डी.सी.सी. बँकेवर कागवाडचे आमदार राजू कागे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांना फोन करणारा अथणीतील कार्यकर्ता चिदानंद सवदी यांच्या चिथावणीवरून बोलत होता.

अथणी येथील विश्रामगृहात भाजप पक्षाचे नेते सत्यप्पा बागेन्नावर आणि कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यावर कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ‘कारखान्यावर ३५० कोटी रुपयांचे कर्ज असतानाही कोणताही विकास केला नाही,’ असा आरोप आमदार राजू कागे यांनी केला होता. त्यानंतर राजू कागे यांची डीसीसी बँकेवर बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली. हे सहन न झाल्यामुळे लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी यांच्या वक्तव्यावरून नदाफ नावाच्या कार्यकर्त्याने राजू कागेंना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सत्यप्पा बागेन्नावर यांनी केला.

या पत्रकार परिषदेत अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: