धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद येथे कर्तव्य बजावत असलेल्या महिला पीएसआयवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात नवलगुंद पोलीस ठाण्याला यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ गजाआड केले आहे.

धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन सुरू असताना, द्यामनागौडा नावाच्या व्यक्तीने दुचाकीवरून येऊन अण्णिगेरी पोलीस ठाण्याच्या पीएसआय उमादेवी यांच्या जीपला धडक दिली. द्यामनागौडा कुलकर्णी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याने पीएसआयला शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला देखील केला होता. याप्रकरणी नवलगुंद पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
आरोपी द्यामनागौडा हा वीज कर्मचारी असून, तो नवलगुंद तालुक्यातील गुडिसागरा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर नवलगुंद पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे आणि हल्ला करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments