Belagavi

‘बेल सिटी डायग्नोस्टिक सेंटर’कडून रुग्णवाहिकेची भेट

Share

जनसामान्यांसाठी अविरत सेवाकार्य करणाऱ्या सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या कार्याची दखल घेत बेल सिटी डायग्नोस्टिक सेंटरने फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांना सुसज्ज रुग्णवाहिका भेट दिली.

यावेळी बोलताना सर्वलोक सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “बेल सिटी डायग्नोस्टिक सेंटरने ही रुग्णवाहिका भेट देऊन आमच्यावरील जबाबदारी आणखी वाढवली आहे. त्यांनी दिलेले हे वाहन घेऊन मी माझ्या शक्तीनुसार गरीब आणि गरजू लोकांची सेवा करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि अधिक जोमाने प्रयत्न करेन.”

या कार्यक्रमास बेल सिटी डायग्नोस्टिक सेंटरचे सर्व संचालक, प्रशासकीय मंडळ, नीळकंठय्या हिरेमठ शास्त्री, शरदचंद्र शास्त्री, बावुसाहब अत्तार, प्रवीण हिरेमठ, नागय्या पूजार, आनंद भातखंडे, गौरीश हिरेमठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

Tags: