अथणी येथील एका युवकाला ड्रायव्हिंगच्या किरकोळ वादातून वायरने अमानुष मारहाण करून त्याला लटकवून क्रूर विकृतीचा व्हिडिओ चित्रित केल्याची संतापजनक घटना उशिरा प्रकाशात आली आहे.

अथणी तालुक्यातील मायाण्णट्टी गावचा रहिवासी असलेल्या शिवप्पा वागरे याने नागानूर पीए येथील मुरसिद्ध श्रीशैल चौगला नावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला केला. इतकेच नव्हे, तर मारहाणीचा हा सर्व प्रकार त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित करून विकृतीचे प्रदर्शन केले आहे.
संबंधित सोमालिंग वागरे यांच्या मालकीच्या मालवाहतूक वाहनावर गेल्या तीन वर्षांपासून चालक म्हणून काम करणाऱ्या मुरसिद्ध चौगला याला दारू पिऊन वाहन चालवत असल्याबाबत जाब विचारत पाठलाग करण्यात आला. त्यानंतर त्याला हारुगेरीजवळील एका निर्जनस्थळी नेण्यात आले आणि सोमवारच्या रात्री अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तरुणाच्या पाठीवर आणि पायांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून, तो सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना हारुगेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Recent Comments