





कर्तव्य बजावताना अनेक पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. या आव्हानांवरच त्यांचे जीवन आणि यश अवलंबून असते. सर्वजण सण-उत्सव साजरे करत असताना, रात्रंदिवस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी झटणाऱ्या पोलीस दलाची सेवा अतुलनीय आहे, असे मत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केले.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस घटक यांच्या वतीने बेळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर ‘पोलीस हुतात्मा दिन’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरासे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, डीसीपी एन.व्ही.बरमणी आणि इतर अधिकारी व्यासपीठावर उपस्थित राहून कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर, कर्तव्य बजावताना पोलिसांनी दिलेले त्याग, बलिदान आणि अविस्मरणीय सेवेची आठवण करत हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच, हवेत गोळीबार करून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.
यानंतर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी हुतात्मा पोलिसांची नावे घेऊन त्यांच्या सेवेचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली.
१९५९ च्या २४ ऑक्टोबर रोजी सीआरपीएफचे जवान चीनसोबतच्या युद्धात हुतात्मा झाले होते. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याच्या सेवाकाळात अनेक आव्हाने येतात आणि त्याच आधारावर त्यांचे जीवन सिद्ध होते. आपण सण-उत्सव साजरे करतो, पण पोलीस अधिकारी दिवसरात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कष्ट करतात. हुतात्मा पोलिसांची नावे घराघरांत चिरकाल ताजी राहतील. त्यांनी पाहिलेली स्वप्ने आपण साकार करू या. पोलीस आणि लोकांनी एकत्र येऊन शांतता व सलोखा प्रस्थापित करण्याचा पाया रचू या. या देशाच्या मातीचे रक्षण आपण सदैव करू या, अशा शब्दांत त्यांनी एका शायरीच्या माध्यमातून संदेश दिला.
यावेळी विविध विभागांचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments