हुबळी आणि धारवाड शहरात दिवाळीच्या सणाचा उत्साह वाढला आहे. नागरिकांनी सणासाठी आवश्यक असलेल्या अंतिम टप्प्यातील खरेदीला सुरुवात केली असून, हुबळी-धारवाड शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे.

धारवाड शहरातील अक्कीपेठ, सुपर मार्केट, सुभाष रोड, नेहरू मार्केट, गांधी चौक येथे दिवाळीच्या खरेदीची धूम आहे. तर हुबळीमध्ये दुर्गदबैल, शाह बाजार, संगोळ्ळी रायण्णा चौक (जनता बाजार), चन्नम्मा सर्कल या ठिकाणी नागरिक दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याची जोरदार खरेदी करत आहेत. मागील तीन दिवसांपासून बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले असूनही नागरिकांच्या खरेदीचा उत्साह कायम टिकून आहे. एकंदरीत दिवाळी सणाची तयारी जोरात सुरू असल्याने बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्याचे दृश्य दिसत आहे.


Recent Comments