Savadatti

सवदत्तीतील कंडक्टर पत्नीच्या खून प्रकरणातील फरार पती अटकेत!

Share

बेळगाव पोलिसांनी सवदत्ती येथे कंडक्टर पत्नीचा खून करून फरार झालेल्या पोलीस शिपायाला अटक करण्यात यश मिळवले आहे.

सवदत्ती येथे घटस्फोट घेतलेल्या पत्नीचा पोलीस शिपायाने निर्घृण खून केल्याच्या प्रकरणासंदर्भात आज बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, सवदत्ती येथे कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या काशव्वावर तिचा पोलीस शिपाई पती संतोष कांबळे याने यापूर्वी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करून सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वी काशव्वाने घटस्फोट घेतला असतानाही, संतोषने तिचा खून केला.

“ज्या दिवशी हा खून झाला, त्याच दिवशी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी संतोष कांबळेला अटक केली आहे,” अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

Tags: