आरएसएसवर सरकारने बंदी घातलेली नाही. शाळा आणि कॉलेजच्या आवारात संस्थांना कार्यक्रमांसाठी परवानगी घ्यावी लागते, असा जो आदेश काढला आहे, त्यात आरएसएसचा उल्लेख कुठेही केलेला नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.

या आदेशात ‘कोणतीही संघटना किंवा संस्था’ असा उल्लेख आहे. भाजप सरकारने जो आदेश काढला होता, त्याच आदेशाची आम्ही पुनरावृत्ती केली आहे. ते करू शकतात, तर आम्ही का करू नये? असा प्रश्न त्यांनी विचारला.
२०१३ मध्ये जगदीश शेट्टर मुख्यमंत्री असताना, त्यांनी संस्थांना शाळा आणि कॉलेजच्या आवारात कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई केली होती. जगदीश शेट्टर ‘हा आदेश मी शिक्षण विभागात असताना काढला नाही’ असे म्हणत आहेत, पण त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात हा आदेश काढला गेला होता, असे सिद्धरामय्या म्हणाले.
संस्थांना परवानगी देणे कठीण नाही. शांतता आणि सुव्यवस्था यावर परवानगी द्यायची की नाही, हे अवलंबून असते, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments