Chikkodi

दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक; चालक गंभीर जखमी

Share

दोन ट्रकमध्ये समोरासमोर भीषण धडक झाल्याने चालकांना गंभीर दुखापत झाली आहे. बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड गावात ही दुर्घटना घडली.

सदलगा-एकसंबा रस्त्यावर ही घटना घडली. एमएच १९ आर ४१३८ आणि केए ४८ ए १९१९ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये ही धडक झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही चालकांना ट्रकमधून बाहेर काढून त्वरित चिक्कोडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चुकीच्या ओव्हरटेकिंगमुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत सदलगा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: