Belagavi

वाल्मीकी समाजाचा अपमान, माजी खासदार कत्तींविरोधात तीव्र संताप

Share

वाल्मीकी समाजाचा कथित अपमान केल्याप्रकरणी माजी खासदार रमेश कत्ती यांच्या विरोधात बेळगाव तालुक्यातील काकती गावात वाल्मीकी समाजाने तीव्र निदर्शने केली. माजी खासदार रमेश कत्ती यांनी केलेल्या वक्तव्यावर समाजाने तीव्र आक्षेप घेत त्यांच्या अटकेची आणि योग्य कारवाईची मागणी केली आहे.

आज बेळगाव तालुक्यातील काकती गावात वाल्मीकी समाजाचे शेकडो लोक एकत्र आले आणि त्यांनी रमेश कत्ती यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला. यावेळी आंदोलकांनी कत्ती यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांच्या छायाचित्रांचे दहन करून उग्र स्वरूपाचे आंदोलन केले. वाल्मीकी समाजाचा अपमान केल्याबद्दल माजी खासदार रमेश कत्ती यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात सिद्धगौडा सुणगार, रामण्णा गुळ्ळी, यल्लप्पा कोलकार, निंगप्पा नाईक, बलराम नाईक, संतोष नाईक, ईरप्पा गंगप्पा यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

Tags: