धारवाडच्या बाह्य परिसरात राष्ट्रीय महामार्गाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागून एका कारने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. धारवाड बाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील ‘राजस्थान ढाबा’जवळ पहाटेच्या वेळी ही घटना घडली.

धारवाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर धारवाड तालुका हद्दीतील ‘राजस्थान ढाबा’जवळ ही दुर्घटना घडली. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागून वेगात आलेल्या कारची धडक बसल्याने कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. घटना घडताच स्थानिकांनी धाव घेतली आणि कारमधील लोकांना वाचवून गरग पोलिस ठाण्याला माहिती दिली. तात्काळ घटनास्थळी आलेल्या गरग पोलिस ठाण्यातील पोलिसांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले आणि तपास सुरू केला. ट्रकला कारची जोरदार धडक बसल्याने कारचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. जखमींची नावे पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर कळणार आहेत. याबाबत गरग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments