Chikkodi

विरोधकांना लढणे शक्य नाही, म्हणून पडद्याआड षडयंत्र : रमेश कत्ती

Share

उद्या होणाऱ्या बेळगाव डीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्याच्या धारवाड उच्च न्यायालयाच्या निर्णयावर माजी खासदार रमेश कत्ती यांनी चिकोडी येथे आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

“या निर्णयामुळे मलाही आश्चर्य वाटले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कोणत्याही संस्था किंवा कोर्टाने त्यात हस्तक्षेप करू नये, असे अनेक आदेश आहेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले. “तरीही, मी कायद्याची माहिती घेऊन पुढे जाईल,” असे रमेश कत्ती म्हणाले.

कायदेशीर लढा देऊन ही निवडणूक लवकरात लवकर घेण्यास आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. विरोधकांना निवडणुकीत समोरून टक्कर देणे शक्य होत नाहीये. त्यामुळे ते मागील दाराने राजकारण करण्याचे षडयंत्र रचत आहेत.

डीसीसी बँकेत रमेश कत्ती संचालक झाले, तर बोगस कंपन्यांना दिले जाणारे कर्ज थांबेल, अशी भीती विरोधकांना आहे. “डीसीसी बँकेतून ६०० ते ७०० कोटी रुपयांची लूट झाली आहे. रमेश कत्ती यांनी बँकेत प्रवेश केल्यास विरोधकांना ही लूट करता येणार नाही, याच कारणास्तव हे सर्व केले गेले असावे,” असे रमेश कत्ती म्हणाले. बँकिंग क्षेत्रातील प्रत्येक टप्प्यावर अडचणी निर्माण करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी हे षडयंत्र रचले आहे, असे त्यांनी नमूद केले.

Tags: