Hukkeri

‘काळा दिवस’ साजरा झाल्यास जिल्हा प्रशासन योग्य कारवाई करेल

Share

‘काळा दिवस’ आयोजित करण्याचा प्रयत्न झाल्यास, बेळगाव जिल्हा प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा अन्य कोणतीही संघटना बॅन करण्याचा प्रस्ताव किंवा विचार सरकारसमोर नाही, असे कायदा आणि संसदीय व्यवहार मंत्री एच.के. पाटील यांनी स्पष्ट केले.

आज बेळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो वा अन्य कोणतीही संघटना, तिला बॅन करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा विचार सरकारसमोर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

काळा दिवस आयोजनासंदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली. १ नोव्हेंबर हा कर्नाटकच्या एकीकरणाच्या पार्श्वभूमीवर भुवनेश्वरी मातेची कर्नाटकातील नागरिक मोठ्या उत्साहाने आराधना करण्याचा दिवस आहे. या दिवशी सर्वांनी सहकार्य करावे. काळा दिवसाच्या आयोजनासंदर्भात जिल्हा प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असे त्यांनी म्हटले.

Tags: