चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका कारने एचडी बीआरटीएस ग्रीलला जोरदार धडक दिली. धारवाडच्या टोप नाका सर्कलजवळ ही घटना घडली असून, यामुळे मोठा अनर्थ टळला.

कलघटगी मार्गे धारवाड शहराकडे जात असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. हुबळी आणि धारवाड शहरांदरम्यान जलद वाहतूक सेवा देणाऱ्या ‘चिगरी’ बससाठी असलेल्या स्वतंत्र रस्ता विभाजक ग्रीलला या कारने धडक दिली. धडकेमुळे कारच्या दर्शनी भागाचेच नुकसान झाले, तर ग्रील उखडून पडले.
स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने कार बाजूला काढली आणि धडकेमुळे उखडलेले ग्रील इतर प्रवाशांना अडथळा होणार नाही अशा पद्धतीने बाजूला केले. अपघाताच्या वेळी रस्त्यावर जास्त वाहनांची वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. ही घटना धारवाड वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments