बेळगावच्या केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कारागृहाची प्रशासकीय व्यवस्था आणि कैद्यांच्या विविध कार्यपद्धती व उपक्रमांची माहिती घेतली. मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक व्ही. कृष्ण मूर्ती यांनी कारागृहाच्या प्रशासन व्यवस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. समाजशास्त्र विभागाचे एकूण ८० विद्यार्थी विभागप्रमुख नवीन कणबरगी आणि सहायक प्राध्यापिका सुश्मिता पुजार यांच्या नेतृत्वाखाली या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.


Recent Comments