Vijayapura

कण्हेरी स्वामींच्या जिल्हा प्रवेशबंदीविरोधात विजापूरमध्ये तीव्र निदर्शने

Share

कण्हेरी मठाचे स्वामी यांच्या जिल्हा प्रवेशबंदीच्या निर्णयाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा निषेध करत, विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील बसरकोड गावात तीव्र आंदोलन करण्यात आले.

कण्हेरी स्वामींचे पूर्वाश्रमीचे गाव असलेल्या बसरकोड येथे माजी आमदार ए. एस. पाटील नडळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी टायर्स जाळून रस्ता बंद केला आणि जोरदार निदर्शने केली.

नडहळ्ळी यांनी राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले कि, “दिवाळीचा सण सुरू असताना स्वामींना जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

Tags: