
भारतीय जनता पार्टीच्या बेळगाव ग्रामीण आणि महानगराच्या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील समस्त हिंदू बांधवांसाठी पंचवीस हजार सुगंधी उटणे चंदन पावडरचे वाटप करण्यात आले.

भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला आहे. भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण आणि महानगर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील सर्व हिंदू बांधवांसाठी गुरुवारी २५ हजार सुगंधी उटणे चंदन पावडरचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी, त्यांनी समस्त हिंदू बांधवांना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Recent Comments