

दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसूबारस म्हणजेच गो-पूजन दिनाचे महत्त्व मोठे असते. मात्र, शहरी भागांत देशी गो-मातांचे दर्शन सहजासहजी होत नसल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘गो-दर्शन’ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदूंच्या मोठ्या सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणाचा आज पहिला दिवस असून, आज गो-पूजा केली जाते. शहरी भागांत देशी गो-मातांचे दर्शन न झाल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बेळगाव तालुक्यातील वाघवडे गावातील देसूर रस्त्यावरील श्री सिद्धेश्वर गोशाळेच्या सहकार्याने ‘गो-दर्शन’ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव शहापुरातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातून सुरू झालेली ही रॅली रेल्वे ओव्हर ब्रीज, पाटील गल्ली, पाटील माळा, मुजावर गल्ली, टिळक चौक, रामलिंग खिंड गल्ली, किर्लोस्कर रस्त्यावरून छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकातील शंभू तीर्थाजवळ पोहोचून या ‘गो-दर्शन’ यात्रेची सांगता झाली. यावेळी गो-मातेची आरती करण्यात आली आणि वसूबारसचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने गोपालक आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments