विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यात फर्निचरच्या एका दुकानात गुरुवारी ७२ वर्षीय वृद्ध शंकरगौडा बिरादार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

बिदरकुंदी गावचे रहिवासी असलेल्या या वृद्धाच्या आत्महत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुद्देबिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


Recent Comments