Belagavi

बेळगावमध्ये ‘प्रकृती स्पा’चा दिमाखदार शुभारंभ

Share

बेळगाव येथे डॉ. दीप्ती अभिजीत पनोरे यांच्या ‘प्रकृती स्पा’ या आयुर्वेदिक उपचार केंद्राचा आणि ‘पंचकर्म सेंटर’ चा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

श्री हतरकी येथील श्री हरीकाका गोसावी भागवत मठाचे पीठाधीश डॉ. आनंदमहाराज गोसावी आणि माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. भाग्यनगर येथे डॉ. दीप्ती अभिजीत पनोरे यांचे ‘प्रकृती आयु स्पा’ आणि ‘पंचकर्म सेंटर’ सुसज्ज स्वरूपात उभारण्यात आले आहे.

या केंद्रात संपूर्ण आयुर्वेदिक उपचार पद्धतीने औषधोपचार केले जातात. तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली सर्व उपचार पुरवले जातात. येथे व्यक्तीच्या वात, पित्त, कफ या प्रकृतीनुसार मसाज, औषधी तेलांचा वापर, सर्व प्रकारचे अभ्यंग तसेच शिरोभ्यंग, पादाभ्यंग यांसारखे उपचार दिले जातात. याव्यतिरिक्त स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उद्वर्तन, तसेच पत्र पिंड, कटी बस्ती आणि जानू बस्ती असे विविध पंचकर्म उपचारही उपलब्ध आहेत.

उपचारांसोबतच येथे सौंदर्यवर्धक सेवाही पुरवल्या जातात. यात हेअर फेशियल, केसांचे उपचार आणि त्वचेचे उपचार यांचा समावेश आहे. तसेच, आयुर्वेदिक पद्धतीने सौंदर्यवर्धक उत्पादने देखील तयार केली जातात. डॉ. पनोरे यांनी स्पष्ट केले की, “येथील सर्व उपचार शुद्ध आयुर्वेदिक पद्धतीने केले जातात, त्यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारे अपायकारक असे काहीही नाही.”

यावेळी वेणूगोपाल गोसावी, अभिजित पनोरे, ॲड. संग्राम कुलकर्णी, दिलीप मुतालिक देसाई, डॉ. प्रा. सुनील देसाई, राहुल पनोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: