



श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्यास नूतन अध्यक्ष चन्नराज हट्टीहोळी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कारखान्यातील प्रत्येक विभागाची पाहणी करून कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. यानंतर त्यांनी कारखान्याच्या कामगारांसमवेत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

कारखान्याचा विकास, कामगारांचे कल्याण आणि आगामी ऊस गाळप हंगामाचे व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा करून, सर्व विभागांनी समन्वयाने जलद गतीने पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याच वेळी कामगारांनी नूतन अध्यक्षांचा सत्कार केला. या भेटीदरम्यान कारखान्याच्या प्रशासकीय मंडळाचे संचालक उपस्थित होते.


Recent Comments