Belagavi

दिवाळी खरेदीसाठी बेळगावच्या ‘बी.एस.सी’मध्ये ग्राहकांची विक्रमी गर्दी!

Share

दिवाळी सणाच्या निमित्ताने बेळगाव येथील बी.एस. चन्नबसप्पा ॲण्ड सन्स् (बी.एस.सी.) या वस्त्रदालनाने एकाच छताखाली संपूर्ण कुटुंबासाठी कपड्यांची उपलब्धता सुनिश्चित करत ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास संपादन केला आहे. वस्त्र खरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने ‘बी.एस.सी.’ला भेट देत आहेत.

दिवाळी सणाच्या निमित्ताने बेळगाव येथील बी.एस. चन्नबसप्पा ॲण्ड सन्स् (बी.एस.सी.) या वस्त्रदालनाने एकाच छताखाली संपूर्ण कुटुंबासाठी कपड्यांची उपलब्धता सुनिश्चित करत ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास संपादन केला आहे. वस्त्र खरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने ‘बी.एस.सी.’ला भेट देत आहेत.

अंधारावर मात करून दिव्यांची रोषणाई करत जीवनात प्रकाश आणणारा दिवाळीचा हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाचा आनंद अधिक वाढवण्यासाठी बेळगाव येथील बी.एस.सी. म्हणजेच बी.एस. चन्नबसप्पा ॲण्ड सन्सने एकाच ठिकाणी संपूर्ण कुटुंबासाठी परवडणाऱ्या दरात कपडे उपलब्ध करून ग्राहकांचा आनंद द्विगुणित केला आहे. सुंदर पोशाख, साड्या, लहान मुलांचे कपडे, चुडीदार, घागरा यासह ग्राहकांच्या आवडीनुसार विविध वस्त्रे येथे खरेदीसाठी उपलब्ध आहेत. विशेषतः, १५० रुपयांपासून ते १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतच्या विविध प्रकारच्या साड्यांचा मोठा संग्रह येथे उपलब्ध आहे. तसेच, १९९ रुपयांपासून ७,००० रुपयांपर्यंतचे कुर्ता पायजमा सेट येथे उपलब्ध आहेत. ब्रॅन्डेड कपड्यांवर १० टक्क्यांची विशेष सवलत दिली जात आहे. या सवलतीबद्दल अमजद जमादार यांनी अधिक माहिती दिली आहे.

कपडे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे येथील कर्मचारी अत्यंत आपुलकीने आणि मनःपूर्वक स्वागत करतात. याव्यतिरिक्त, अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भेटवस्तू देखील दिल्या जातात. याबद्दल बोलताना ‘बी.एस.सी.’चे व्यवस्थापक ईरण्णा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की,
“गेल्या तीन वर्षांपासून आम्हाला ग्राहकांचे उत्तम सहकार्य मिळत आहे. ग्राहकांनी यावर्षीची दिवाळीदेखील ‘बी.एस.सी.’सोबत साजरी करावी.”

याशिवाय, कपडे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी सुरक्षित पार्किंग तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) चार्जिंगची व्यवस्था देखील ‘बी.एस.सी.’ द्वारे पुरवली जाते.

मग, आता वाट पाहण्यात वेळ कशाला घालवता? आजच भेट द्या! बी.एस.सी. द टेक्स्टाईल मॉल, टिळकवाडी, बेळगाव.

Tags: