Accident

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले काँग्रेस नेते!

Share

खानापूर भागात रस्त्याच्या मधोमध अपघात झाल्याने तडफडणाऱ्या चार जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी खानापूर ब्लॉक काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष ईश्वर घाडी आणि महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा दीपा पाटील यांनी सहकार्य करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

खानापूर तालुक्यातील हिरेअंग्रोळी -मुगळीहाळ रस्त्यावर काल रात्री दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला होता. यामध्ये चार जण जखमी झाले आणि ते रस्त्यावर मदतीसाठी विव्हळत होते. हे पाहताच ईश्वर घाडी आणि दीपा पाटील यांनी तात्काळ जखमींकडे धाव घेतली, त्यांच्याशी संवाद साधला आणि रुग्णवाहिकेची सोय करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. ग्रामीण भागातील खराब रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अपघात वाढले असताना, या दोन नेत्यांनी जखमींना त्वरित मदत पुरवून प्रथमोपचारासाठी सहकार्य केले.

Tags: