Vijayapura

विजापूरमध्ये विद्यार्थीनी बलात्कार, हत्या प्रकरणाविरोधात ‘एबीव्हीपी’चे आंदोलन

Share

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील एका विद्यार्थीनीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुद्देबिहाळ शहरात तीव्र आंदोलन केले.

या पाशवी घटनेबद्दल योग्य तपास करून आरोपींना त्वरित आणि कठोर शिक्षा मिळावी, या मागणीसाठी बसवेश्वर चौक येथे मानवी साखळी तयार करून हे भव्य आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व एबीव्हीपीचे राज्य सचिव सचिन कुळगेरी यांनी केले. या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

Tags: