Belagavi

आमदारद्वयीच्या उपस्थितीत युवराज कदम यांनी स्वीकारला ‘काडा’ अध्यक्षपदाचा कार्यभार

Share

बेळगाव येथील ‘काडा’ च्या अध्यक्षपदी युवराज कदम यांनी आज दोन आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला.

बेळगावच्या ‘काडा’ अध्यक्षपदी निवड झालेले युवराज कदम यांनी आज जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते निर्माण करणे आणि चेक डॅम बांधण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच, शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी कष्ट घेतले जातील. जलसंधारणाला प्राधान्य दिले जाईल. नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांबाबत आवश्यक उपाययोजना केल्या जातील. मराठी भाषिक असूनही आपल्याला ‘काडा’ अध्यक्षपद देण्यात आले आहे, त्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर विविध संस्था-संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कागवाडचे आमदार राजू कागे, जिल्हा हमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: