Belagavi

बेळगाव दक्षिण मतदारसंघात दिवाळीनंतर रस्ते विकासकाम सुरू

Share

बेळगाव दक्षिण मतदारसंघातील भातकांडे शाळेपासून एस.पी.एम. रोडपर्यंतच्या रस्त्याच्या विकासाला दिवाळीनंतर सुरुवात केली जाईल, असे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

आज बेळगाव मध्ये आमदार अभय पाटील यांनी भातकांडे शाळेपासून एस.पी.एम. मार्गापर्यंतच्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून रस्त्याची सद्यस्थिती, गटारे तसेच अन्य विषयांबाबत माहिती घेतली.

यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, दिवाळीनंतर भातकांडे शाळेपासून एस.पी.एम. रोडपर्यंतच्या रस्ते विकासाचे काम हाती घेण्यात येईल. याशिवाय, भातकांडे शाळेपासून जुन्या पी.बी. रोडपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर बसवण्यात येणार आहेत. हे काम एका महिन्याच्या आत पूर्ण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी स्थानिक नागरिक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: