राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहरात हजारो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन अत्यंत उत्साहात पार पडले.

स्वयंसेवकांनी निपाणी शहराच्या विविध भागांतून पथसंचलन केले. हे संचलन राणी चन्नम्मा चौक आणि जुना पीबी रस्ता येथून सुरू झाले. बेळगाव नाक्यामार्गे म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर येऊन त्याची सांगता झाली.
मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळ्या काढून तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. संचलनादरम्यान डॉ. बी.आर. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरू बसवेश्वर, छत्रपती संभाजी महाराज, राणी चन्नम्मा यांच्यासह अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सुरक्षेच्या दृष्टीने उपविभागीय पोलिस अधिकारी गोपालकृष्ण गौडर, पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, अनिता राठोड, शिवराज नायकवाडी आणि रमेश पवार यांच्यासह चार पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.


Recent Comments