महाराष्ट्र राज्यातील सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला विजापूर येथे अटक केली आहे. जमिनीमध्ये दडलेले गुप्त धन काढून देण्याचे आमिष दाखवून लोकांना १ कोटी ८७ लाख रुपयांना फसवणारा मोहम्मदकादिर शेख नावाचा भोंदू बाबा गजाआड झाला आहे.

या भोंदू बाबाने सोलापूर शहरात अनेक लोकांना फसविले होते, त्यामुळे सोलापूर पोलिसांनी विजापूर येथे येऊन त्याला अटक केली. बाबाच्या घरातून जादूटोण्यासाठी वापरले जाणारे अनेक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. मोहम्मदकादिर शेख याने सोलापूर येथील गोविंद वंजारी नामक व्यक्तीच्या जमिनीतील निधी काढून देण्याचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक केली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.


Recent Comments