आमदार अशोक पट्टण यांनी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या या निर्णयामागे नेमके कोणते राजकीय कारण आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.

आज, डीसीसी बँक निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. याच दिवशी आमदार अशोक पट्टण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
आपली माघार ही विशिष्ट राजकीय कारणांशिवाय नाही. मात्र, आम्ही कोणाला पाठिंबा देणार, हे लवकरच जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. माघारीच्या संदर्भात आपण पालकमंत्री किंवा अन्य कोणालाही भेटलो नसून, त्यांची भेट अन्य विषयांवर झाली होती.
“राजकारणात अनेक कारणे असतात. आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही. तुम्ही विचारताय म्हणून तडजोड झाली असे समजून घ्या. डीसीसी बँक निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार नाही,” असे सूचक विधान त्यांनी केले.
याव्यतिरिक्त मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. ‘मला मंत्रीपद मिळावे, त्यानंतरच खात्याचा विचार करू. यावेळी मला ९९ टक्के मंत्रीपद मिळणारच, असा विश्वास आहे,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ‘मी कोणत्याही गटाचा किंवा पॅनलचा नाही. आम्ही सिद्धरामय्या यांचे समर्थक आहोत,’ अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


Recent Comments