खानापूर तालुक्यातील नंदगड येथे असलेल्या “खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटी सहकारी संघ, नंदगड” च्या संचालक मंडळाची निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत अरविंद पाटील पॅनलचा दणदणीत विजय झाला. यानंतर कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

अरविंद पाटील यांच्या पॅनलचे तीन उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यापूर्वीच अरविंद पाटील यांच्यासह अन्य नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. आज झालेल्या मतदानामध्ये विरोधी उमेदवारांपैकी कोणालाही शंभर मतांचा आकडा पार करता आला नाही. एका विरोधी उमेदवाराला केवळ १११ मते मिळाली. यापूर्वी अरविंद पाटील यांच्या गटातील १३ पैकी १० उमेदवार बिनविरोध निवडून आले होते आणि उर्वरित तीन जागांसाठी आज निवडणूक झाली होती.
याचबरोबर, अरविंद पाटील यांची बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदीही नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नंदगड येथे सोसायटीच्या निवडणुकीत विजय मिळाल्याने एकाच दिवशी दुहेरी विजयोत्सव साजरा करण्यात आला. सोसायटी कार्यालयासमोर गुलाल उधळून, ‘हर्षोद्गार’ करत आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. अनेक नेत्यांनी अरविंद पाटील यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले.


Recent Comments