माजी आमदार अरविंद पाटील यांची बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या संचालक मंडळावर खानापूर तालुक्यातून सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. पाटील यांच्या या विक्रमी विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा विजयोत्सव साजरा केला.

खानापूर तालुक्यातून पाचव्यांदा डीसीसी बँकेवर माझी निवड होण्यासाठी तालुक्यातील पीकेपीएस (प्राथमिक कृषी पतसंस्था) संचालकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पाठिंबा दिला. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होती, पण पीकेपीएसच्या संचालकांनी आम्हाला पाठिंबा दिला. सर्व नेत्यांनी मला पाठिंबा दर्शवला असून, मी त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केले आहे. ‘तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक सहकारी संस्था स्थापन करून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून तसेच घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
Recent Comments