निपाणी सहकारी मतदारसंघातून बी.डी.सी.सी. बँकेच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आपला अर्ज कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असे स्पष्ट करत माजी मंत्री शशिकांत जोल्ले यांना आव्हान दिले आहे.

शनिवारी बेळगाव डिसिसी बँक परिसरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “मी डिसिसी बँक निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच नाही. निपाणी सहकार क्षेत्रासाठी माझे मोठे योगदान आहे. निवडणुकीच्या वेळी आमचा एक गट तयार आहे. वीरकुमार पाटील यांच्यासह अनेक नेते एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहोत. मागील लोकसभा निवडणुकीत मी प्रियांका जारकीहोळी यांच्या बाजूने काम केले आहे. निवडणुकीच्या वेळी परिस्थिती बदलते. मी सतीश जारकीहोळींचा आशीर्वाद घेतला आहे आणि ते आमच्यासोबत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत माघार घेण्याचा कोणताही विचार नाही,” असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.


Recent Comments