Dharwad

धारवाड जिल्ह्यात कांदा, सिमेंट आणि डिझेल टँकरमध्ये साखळी अपघात

Share

धारवाड जिल्ह्यातील कलघटगी येथील कारवार रस्त्यावर कांद्याने भरलेला ट्रक, सिमेंटने भरलेला ट्रक आणि डिझेल टँकर यांच्यात साखळी अपघात झाला. या अपघातात तिन्ही ट्रक्सचे चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत.

धारवाड जिल्ह्यातील कलघटगी येथील कारवार रस्त्यावर ही दुर्घटना घडली. या भीषण अपघातात तीन ट्रक एकमेकांवर आदळल्यामुळे एका ट्रकमधील चालक आणि क्लिनर आत अडकले होते. कलघटगी पोलीस ठाण्याचे एएसआय ए. एम. नवलूर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.

तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी खूप प्रयत्न करून ट्रकमध्ये अडकलेल्या चालक आणि क्लिनरला बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात कलघटगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून, अपघाबाचे नेमके कारण आणि जखमींचा सविस्तर तपशील प्राथमिक तपासानंतर कळेल, असे पोलिसांनी सांगितले.

Tags: