
श्री वैष्णवी शिक्षण संस्था आणि एंजल इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमध्ये पाच दिवसीय वस्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

लघु उद्योजक आणि महिला ग्रामोद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि उपमहापौर श्रीमती वाणी विलास जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कन्यापूजन करून करण्यात आले. त्यांनी यावेळी संबोधित करताना सांगितले की, महिलांसाठी अशा प्रकारचे वस्तू प्रदर्शन आणि चांगले कार्यक्रम आयोजित करणे हि उत्तम बाब आहे.
३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान आयोजित या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ख्यातनाम चित्रकार श्रीमती सुजाता वस्त्रद आणि संजना सीगेहळ्ळी तसेच प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यानंतर “आरोहण” नावाचा फॅशन शो आयोजित करण्यात आला. कुमारी श्रेया बागलकोट आणि मिसेस कर्नाटक २०२३ श्रीमती यशोदरा इब्राहिमपूर यांनी परीक्षकाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रमात लहान मुले, पालक आणि स्पर्धकांनी उत्साहाने भाग घेऊन आनंद घेतला.
यानंतर पॉवर स्टार डॉ. पुनीत राजकुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये संगीत दिग्दर्शक व गायक बी. सोनू अशोक यांनी त्यांच्या पथकासह गाण्याचे सादरीकरण केले. यावेळी दिवंगत अभिनेते डॉ. पुनीत राजकुमार यांचे चित्र चित्रकार सुजाता वस्त्रद यांनी रेखाटले.


Recent Comments