टायरच्या दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहरात जुन्या पीबी रस्त्यावर घडली आहे.

निपाणी नगरपरिषद कार्यालयाच्या समोरील उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीचे टायर विक्री आणि पंक्चरचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. मालक उत्तम जाधव हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेल्यानंतर ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.


Recent Comments