Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते ५० अंगणवाडी सेविकांना टॅबचे वाटप

Share

महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते बेंगळुरू शहरातील ५० अंगणवाडी सेविकांना टॅबचे वाटप करण्यात आले. सुतार लर्निंग फाऊंडेशनच्या वतीने विधानसौध येथील त्यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. शामला इक्बाल, महिला आणि बालविकास विभागाचे संचालक महेश बाबू, मंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. टी. एच. विश्वनाथ, मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बी. एच. निश्चल, महिला आणि बालविकास विभागाच्या बेंगळुरू शहर उपसंचालक सुमंगला मळापूर, तसेच सुतार लर्निंग फाऊंडेशनचे शंकर सिंग, नवीन एम. एल. आणि कार्तिक स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: