बेळगाव जिल्ह्याीतील रायबाग तालुक्यातील इटनाळ गावात पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबांमध्ये जोरदार संघर्षातून आणि हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

गावातील सदाशिव डोंगे आणि होननाळे कुटुंबांमध्ये ही हाणामारी झाली. या भांडणासाठी आलेल्या १०० हून अधिक लोकांनी दोन ट्रॅक्टर आणि एका क्रशरमधून येऊन दहशत निर्माण केली, असे सांगितले जात आहे. या हल्लेखोरांनी डोंगे यांच्या घरातील महिला आणि वयस्कर वृद्धांवरही हल्ला केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी डोंगे यांच्या मालकीच्या जेसीबी आणि ट्रॅक्टरवर जोरदार दगडफेक केली. या मारामारीत जखमी झालेल्या सदाशिव डोंगे यांच्या पत्नीला आणि वृद्धांना गोकाक येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदाशिव डोंगे यांच्या पत्नीवर आणि वृद्धांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच, हारुगेरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पूर्ववैमनस्यातून ही हाणामारी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना हारुगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. मारामारीत सहभागी असलेल्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.


Recent Comments