Belagavi

सचिन हॉस्पिटलतर्फे मोफत वंध्यत्व निवारण आणि स्त्रीरोग तपासणी शिबिर

Share

मिरज येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण सेंटर म्हणून ख्याती असलेल्या सचिन हॉस्पिटल यांच्या वतीने अपत्यहीन दाम्पत्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण व स्त्रीरोग तपासणी शिबिराचे आयोजन रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी शिवाजी रोड, हॉटेल प्रियदर्शनीजवळ, मिरज येथे करण्यात आले आहे.

या शिबिरामुळे दाम्पत्यांना आणि स्त्रियांना विविध गंभीर आजारांवर आधुनिक उपचार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून हॉस्पिटलने हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे.

हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अपत्यप्राप्ती न झालेल्या दाम्पत्यांना आणि स्त्रियांच्या विविध आजारांवर उपचार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जात आहे, असे मत डॉ. सचिन सुगाणावर यांनी व्यक्त केले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अनेक सामाजिक उपक्रमांपैकीच हे मोफत तपासणी शिबिर एक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिबिरामध्ये रुग्णांना मोफत तपासणी व औषधे दिली जाणार आहेत, तसेच शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना आधुनिक उपचार व शस्त्रक्रिया ह्या अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील.

या शिबिराच्या माध्यमातून वंध्यत्वग्रस्त असलेल्या स्त्री व पुरुष यांच्यातील दोषांविषयी सखोल मार्गदर्शन केले जाईल. टेस्ट ट्यूब बेबी (Test Tube Baby) सारख्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती दिली जाणार आहे. यामध्ये विशेषतः आय.यू.आय. (IUI), वीर्यपेढी, स्त्रीबीजदान, गर्भ गोठवून ठेवणे, आय.व्ही.एफ. (IVF), आय.सी.एस.आय. (ICSI) व व्हिट्रिफिकेशन यासह बंद गर्भनलिका चालू करणे आणि स्त्रीबीज तयार न होणे यावर मार्गदर्शन केले जाईल. पुरुष वंध्यत्वामध्ये शुक्राणूंमधील दोष, त्यांची संख्या व हालचाल कमी असणे, शुक्राणू मृत असणे, तसेच लैंगिक समस्यांवर आधुनिक उपचार व मायक्रोसर्जरी याविषयी माहिती दिली जाईल. स्त्री आणि पुरुषांमधील दोषानुसार टेस्ट ट्यूब बेबी व आय.यू.आय. उपचारांची पद्धत ठरवावी लागते व त्यानुसार खर्च येतो.

स्त्री आरोग्यामध्ये मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाच्या गाठी, अंडाशयाला सूज आणि पांढरे जाणे यांसारख्या गर्भाशयाच्या आजारांवर दुर्बिणीद्वारे (Laparoscopy) आधुनिक उपचार करता येतात. त्याचबरोबर कर्करोगासारख्या (Cancer) आजारावर आधुनिक मशीनचा वापर करून लवकर निदान व उपचार करणाऱ्या तंत्राविषयी माहिती दिली जाईल. गर्भाशय काढण्याची गरज असल्यास ती शस्त्रक्रिया आधुनिक पद्धतीने व कमी खर्चात करण्याची सोय उपलब्ध आहे. पुरुष व स्त्री वंध्यत्व, लैंगिक समस्या, गुप्तरोग, शुक्राणू कमी असणे, अजिबात नसणे, शीघ्रपतन, नपुंसकता, स्वप्नदोष, वयोमानानुसार आलेली कमजोरी, तसेच विवाहपूर्व व विवाहानंतरच्या समस्यांसाठी आधुनिक उपचार यांवरही मार्गदर्शन केले जाईल.

हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची टेस्ट ट्यूब बेबी प्रयोगशाळा कार्यरत असून, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असल्यामुळे वंध्यत्वावरील उपचारांचा यशाचा आलेख अधिक आहे. सुरक्षित मातृत्व व सुदृढ बालक हे या रुग्णालयाचे वैशिष्ट्य असून, विविध घटकांना त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार सुविधा व उपचार पद्धती उपलब्ध आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील अनेक रुग्णांना या हॉस्पिटलमधील उपचारांमुळे अपत्यप्राप्तीचे भाग्य लाभले आहे. याचे समाधान डॉक्टरांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे विनम्र आवाहन सचिन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: