बेळगाव मधील हायटेक मोटर्सने यंदाच्या दसरा-दिवाळी सणाचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्या ग्राहकांना मोठी गोड बातमी दिली आहे. अशोक लेलँडचे ‘दोस्त’ वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीने खास धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. यासोबतच, लकी ड्रॉमधील विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.

बेळगाव मधील अशोक लेलँड वाहनांचे अधिकृत विक्री केंद्र असलेल्या हायटेक मोटर्सने यंदाच्या दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. अशोक लेलँडचे ‘दोस्त’ वाहन खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हायर कंपनीचे फ्रीज भेट म्हणून दिले जात आहे. यामुळे ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास पुन्हा एकदा जिंकण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. आज नुकताच मागील लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये अनेक विजेत्यांना बक्षिसे मिळाली.
चिकोडीचे हनमंत सोनवणे यांनी लकी ड्रॉमध्ये मोटारसायकल जिंकली, तर बेळगावचे राजकुमार गावकर यांना रेफ्रिजरेटर मिळाले. तसेच, बेळगावच्या सलोनी सनदी यांना टी.व्ही., जमखंडीचे प्रकाश कागि यांना मोबाईल फोन आणि चिकोडीचे बसवराज हिरेकोडी व अथणीचे गुरुशांत नंदगाव यांनी मायक्रोवेव्ह ओव्हन जिंकले आहेत.
कुडचीचे आकीब संदरवाले या ग्राहकाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “हायटेक मोटर्स ग्राहकांना नेहमीच चांगली सेवा पुरवते. तसेच, कंपनीची सेवा सर्वत्र उपलब्ध आहे. येथे दरवेळी नवनवीन लकी ड्रॉ आयोजित केले जातात. प्रत्येक ग्राहकाला स्मार्ट वॉच भेट म्हणून दिले जात आहे. अशोक लेलँडने आपल्याला उत्तम वाहन दिले आहे,” असे त्यांनी म्हटले.
यावेळी, हायटेक मोटर्सचे संचालक राजेंद्र देसाई यांनी माहिती दिली की, “हायटेक मोटर्स टीव्हीएस, अशोक लेलँडसह इतर अनेक नामांकित कंपन्यांची वाहने ग्राहकांना उपलब्ध करून देते. यंदाही सणाच्या निमित्ताने अशोक लेलँडतर्फे ‘अशोक दोस्तोत्सव’ नावाचा लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. त्यातील विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात येत आहेत. तसेच, ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक ग्राहकाला रेफ्रिजरेटर भेट म्हणून दिला जात आहे,” असे त्यांनी नमूद केले.
हायटेक मोटर्सचे एम.डी. विनयकुमार बाळिकाई यांनी सांगितले की, “दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर अशोक लेलँडचे अधिकृत वितरक असलेल्या हायटेक मोटर्सतर्फे आयोजित करण्यात आलेला लकी ड्रॉ आज उघडण्यात आला. थेट प्रक्षेपणाद्वारे ग्राहकांशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित ग्राहकांना स्मार्ट वॉच देण्यात आले आहेत. दिवाळीच्या काळात सर्व ग्राहकांना फ्रीज भेट म्हणून देण्यात येत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘दोस्त’ वाहन खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हायर कंपनीचे फ्रीज भेट म्हणून दिले जात आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत ही ऑफर सुरू असून, ग्राहकांनी याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन हायटेक मोटर्सच्या संचालकांनी केले आहे.
यावेळी विक्री व्यवस्थापक सचिन पाटील, सेवा व्यवस्थापक आनंद चापगाव यांच्यासह ग्राहक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तर मग, आता उशीर कशाचा? आजच आपले वाहन खरेदी करा आणि फ्रीजची भेट मोफत मिळवा. त्वरा करा, ही ऑफर केवळ २३ ऑक्टोबरपर्यंतच आहे.


Recent Comments