Belagavi

महर्षी वाल्मीकि जयंतीनिमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा

Share

महर्षी वाल्मीकि जयंती निमित्त बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात एका भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

महर्षी वाल्मीकि जयंतीनिमित्त बेळगाव शहरातील सम्राट अशोक सर्कल येथून या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत विविध लोककला पथकांनी सहभाग घेतला होता.

महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, उत्तर मतदार संघाचे आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह समाजातील प्रमुख व्यक्तींनी महर्षी वाल्मीकिंच्या रथोत्सवाचा शुभारंभ केला.

यावेळी बोलताना उत्तर बेळगावचे आमदार आसिफ सेठ म्हणाले, “महर्षी वाल्मीकि जयंती बेळगावात अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. वाल्मीकि समाज हा कष्टकरी समाज असून, तो एकजुटीचा आदर्श आहे. महर्षी वाल्मीकिंनी संपूर्ण जगाला दिलेले रामायण प्रत्येकाने वाचून ते जीवनात अंगीकारावे. आमचे सरकार वाल्मीकि समाजाच्या सोबत आहे,” असे त्यांनी मत व्यक्त केले.

ही शोभायात्रा सम्राट अशोक सर्कल येथून सुरू झाली त्यानंतर किल्ला मार्ग, आर.टी.ओ. संगोळ्ळी रायण्णा रस्ता, एस.पी. ऑफिस रोडमार्गे कुमार गंधर्व कलामंदिर येथे पोहोचली, यानंतर व्यासपीठावर भव्य कार्यक्रम पार पडला.

Tags: